सातारा : पुढारी वृत्तसेवा : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दि. 24 फेब्रुवारी रोजी विविध संघटना व मित्र समुहाच्यावतीने जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जलमंदिर पॅलेसमधून देण्यात आली.
वाढदिनी खा. उदयनराजे भोसले सकाळी 7 वाजता जलमंदिर पॅलेसमधील तुळजाभवानी देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर दत्तचौक कराड येथे सकाळी 7 वाजता राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. तसेच सकाळी 9 वाजता जलमंदिर पॅलेस येथे शिवप्रतिष्ठानच्यावतीने वही तुला करण्यात येणार आहे. सकाळी 9.30 वाजता पाली ता. कराड येथे खंडोबा देवस्थान येथे अभिषेक कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10 वाजता करंजे तर्फ सातारा येथील कातकरी वस्तीमध्ये खाऊ वाटप कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 10.15 वाजता पोवई नाका मंडई येथे केक कापण्यात येणार आहे. त्याच ठिकाणी सकाळी 10.25 वाजता हॉकर्स संघटनेतर्फे सरबत वाटप करण्यात येणार आहे. माची पेठ काळा दगड या ठिकाणी सकाळी 11 वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. संभाजीनगर बारावकरनगर हॉल येथे 11.30 वाजता आरोग्य शिबीर होणार आहे.
सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे 12 वाजता कोरोना काळात कार्य केलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचार्यांचा सत्कार खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच सिव्हिल हॉस्पिटलमधील रूग्णांना फळे वाटप, अन्नदान वाटप करण्यात येणार आहे. दुपारी 12.30 वाजता रिमांड होम येथील मुलांना खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात येणार आहे. दुपारी 12.45 वाजता सदरबझार येथील ज्येष्ठ नागरिक हॉल येथे मतदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी 12.50 वाजता वाढेफाटा येथे केक कापण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता किडगाव ता. सातारा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
गांधी मैदान राजवाडा येथे रिक्षा सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6. 15 वाजता राधिका रोड येथे सेंट्रल रेल्वे यात्री आरक्षण सुविधा सेंटरचे उद्घाटन करण्यात येेणार आहे. करंजे येथे कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी मैदान सायंकाळी 7.30 वाजता मावळा स्वराज यौध्दे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 8 वाजता जलमंदिर पॅलेस व गांधी मैदान येथे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत.
पुसेसावळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये फळे वाटप करण्यात येणार आहे. तसेच पुसेगाव येथे जि. प. शाळांना व अंगणवाडी येथे खाऊ वाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परळी, ता. सातारा येथे मासेमारी करणार्या लोकांना फळे वाटप व मिठाईचे वाटप करण्यात येणार आहे. मार्केट यार्ड कोरेगाव पेठ कोरेगाव येथे मागासवर्गीय वस्तीत पाण्याच्या टाकीचे वाटप करण्यात येणार आहे.
हेही वाचलंत का?