सातारा : कास पठारावरील औषधी वनस्पतीचा वापर जगासाठी व्हावा: श्रीपाद नाईक

सातारा : कास पठारावरील औषधी वनस्पतीचा वापर जगासाठी व्हावा: श्रीपाद नाईक
Published on
Updated on

बामणोली(सातारा), पुढारी वृत्तसेवा : कास पठारावरील पुष्प औषधी वनस्पतींचा वापर जगासाठी करण्यात यावा, असे मत गोवा लोकसभेचे खासदार, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. बुधवारी मंत्री श्रीपाद नाईक हे कास पुष्प पठार भेट दिली.

कास पुष्प पठार परिसरातील जैवविविधतेची तसेच वेगवेगळ्या फुलांची माहिती नाईक यांनी जाणून घेतली. कास पुष्प पठाराचे संरक्षण व संवर्धन हे कास पठार कार्यकारी समितीच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे सुरू असल्याची भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. युनेस्कोने या संपूर्ण पठार परिसराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याने या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या फुलांच्या प्रजातींना अधिक महत्त्व प्राप्त झाले असून पठार परिसरामध्ये ज्या काही औषधी वनस्पती आहेत.

श्रीपाद नाईक यावेळी बोलताना म्‍हणाले, कासच वैभव पाहून मला खूप समाधान वाटल. वर्षभर जे काही या ठिकाणी पर्यटक येतात त्यामध्ये जागतिक स्थरावरून जास्तीत जास्त पर्यटक कसे येतील यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करु. कास पुष्प पठाराचा अधिक विकास होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. या ठिकाणी उगवणाऱ्या वनस्पती या पारंपरिक व नैसर्गिक असल्याने याचा औषधी वनस्पती म्हणून वापर होणार असून याचा जगाला फायदा व्हावा. तसेच या वनस्पतीचे औषध म्हणून संशोधन व्हावे यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करु.

कास पुष्प पठार हे भारत मातेचे वैभव असून हे वैभव जगाला दाखवण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. पर्यावरणाचा समतोल राखून हे वैभव जपण्याचं काम आपण केलं पाहिजे व ते आपण वनविभाग व कास पठार कार्यकारी समिती करत आहात त्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news