शिर्डी : साई चरणी भक्ताकडून ९ लाख ९८ हजारांचे सुवर्ण पुष्प अर्पण | पुढारी

शिर्डी : साई चरणी भक्ताकडून ९ लाख ९८ हजारांचे सुवर्ण पुष्प अर्पण

शिर्डी, पुढारी वृत्तसेवा: शिर्डीत साईबाबांच्या चरणी प्रत्येकवेळी अनोखे दान करण्याची कायमच परंपरा असतेच. असे अनोखे दान साई चरणी करत हैदराबाद येथील एका भाविकाने तीन सुवर्ण पुष्प अर्पण केले. साईबाबांवर नितांत श्रद्धा ठेवणारे भाविक केवळ साई सेवा म्हणून नाना प्रकारे सेवा करण्याचे अनुभव आहेत. त्यामध्ये काही भक्त अन्नदान करतात. तर काही भक्त साई संस्थानच्या रुग्णालयात यंत्रसामग्री देऊन सेवा करतात.

काही जण मंदिरात विद्युत रोषणाई करतात. तर काही जण मंदिरात फुल सजावट करतात. साई चरणी यापूर्वी सिंहासन, ताट वाटी, पाण्याची झारी आणि सुवर्ण मुकुट साई चरणी अर्पण केलेल्या आहेत. अशीच सेवा हैदराबाद येथील भाविक एम. राजेंद्र रेड्डी यांनी २१४. ४५ ग्रॅम वजनाचे म्हणजेच ९ लाख ९८ हजारांचे तीन नग असे सुवर्ण पुष्प दान केले आहेत. ही देणगी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, मुख्य लेखाशाखाधिकारी कैलास खराडे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली.

Back to top button