

सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा येथील विषयाबाबत दोन्ही राजांशी चर्चा झाली आहे. सातारा येथे फार गंभीर गोष्ट घडलेली आहे असे नाही. अशा गोष्टी होतच असतात अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
साताराच्या दोन्ही राज्यांशी चर्चा झाली आहे. जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात त्यांनी काही निवेदने ही दिली आहेत. विकास कामासंदर्भात विशेषत: विकास कामासंदर्भात विस्तृत चर्चा आज झाली. दोन्ही राजांना जनतेचे प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत. त्यांना जनतेचे प्रश्न मांडायचे आहेत. अशा गोष्टी कधी कधी होत असतात, पण असे नाही की जिथे काही गंभीर घडले आहे. अशा गोष्टी कधी कधी होत असतात ते फार अडचणीचे आहे असे नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असा विश्वासही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा