अहमदनगर : अल्पवयीन मुलीला पळविणारे दोघे गजाआड | पुढारी

अहमदनगर : अल्पवयीन मुलीला पळविणारे दोघे गजाआड

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍या दोन सराईत आरोपींना 24 तासांच्या आत एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी बीड जिल्ह्यातून ताब्यात घेतले असून, पीडित मुलीची सुटका करण्यात आली आहे. नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथून 18 जून रोजी अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता.
रामेश्वर बाप्पा शिंगोळे (रा.पिंपळगाव माळवी), अनिल सुभाष गोलवड (रा. सावेडी नाका, ) अशी आरोपींची नावे आहेत.

सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांना माहिती मिळाली होती की, मुलीला पळवून नेणारे दोघे आरोपी आष्टी (जि.बीड) येथे आहेत. या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांच्या पथाकाने आरोपींना आष्टी येथून अटक केली. अनिल सुभाष गोलवड हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर तोफखाना, एमआयडीसी पोलिस ठाण्यात मारहाण, अपहरण असे दोन गुन्हे दाखल आहेत. सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गशदर्शनाखाली उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ, योगेश चाहेर, दत्तात्रय पवार, भास्कर मिसाळ, सुरेश सानप, किशोर जाधव, गजानन गायकवाड यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा

पुणे : सदस्य नियुक्तीची फाईल गहाळ ; फेरीवाला समितीची स्थापनाच रखडली

अहमदनगर : गावठी कट्टा, काडतुसे बाळगणार्‍याला अटक

नाशिक : धुलाई गैरव्यवहारातील पैसे आज होणार जमा

Back to top button