

Chhagan Bhujbal Praises Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज साताऱ्यातून बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगाव इथल्या कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी निधी देण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार हे पिंपरीत महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपवर टीका करताना दिसले.
छगन भुजबळ यांनी भाषणावेळी म्हणाले की, आमचे सहकारी जयकुमार गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यात मेहनत घेतली आहे. अतिशय चांगला माहोल आणि एवढी मोठी उपस्थिती पहिल्यांदात नायगावला लाभलेली आहे. दोन महिन्यापूर्वी माझ्या ह्रदयाचं ऑपरेशन झालं. मी डॉक्टरांकडे या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी मागितली.
डॉक्टरांनी देखील मला जाण्याचा परवानगी दिली आहे. मात्र अजून एक महिना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. आज १९५ वी सावित्रीबाई फुले जयंती आहे. मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना नम्रपूर्वक नमन करतो.'
त्यानंतर भुजबळ जुन्या आठवणींन उजाळा देताना म्हणाले,'आज आपण एवढा मोठा कार्यक्रम केला. इथं मोठं स्मारक होतंय. मात्र एक २५, ३० वर्षापूर्वी १९९३ ला राष्ट्रपतींनी फुले वाड्याचे लोकार्ण केल्यानंतर हरीभाऊ नरके माझ्याकडे आले. नायगावला सावित्रीबाई फुलेंचे जन्मगाव आहे. तिथं आपण कायतरी केलं पाहिजे. आम्ही सावित्रीबाईंचा जन्म झाला ते घर पाहिलं. आम्ही इतर घरं जशी आहेत तसंच याचं देखील निर्माण झालं पाहिजे. काम सुरू केलं मात्र पैशाचा प्रश्न आला. त्यावेळी मी उपमुख्यमंत्री होतो. पण एमएलसी होतो.'
ते पुढे म्हणाले, 'त्यावेळी वर्षाला एक ४०, ५० लाख मिळत होते. त्यातीलही २० २५ लाख खर्च झाले होते. नियमही खूप होते. त्यातही आम्ही प्रयत्न करून ते घर उभा केलं. सांगण्याच्या उद्येश इतकाच की त्यावेळी आम्हाला २०, २५ लाख उभे करण्यासाठी अडचण येत होती. पण आता काय १५० कोटी रूपयांच्या कामाचं भूमीपुजन झालं. देवा देता हैं तो छप्पर फाड के देता हैं. त्यामुळे मी तुमच्या सर्वांच्या वतीने शाहू फुले अंबेडकरांच्या अनुयायांच्या वतीने त्यांचे आभार मानतो.'
यानंतर छगन भुजबळ यांनी पुण्याच्या फुले वाड्याचं काम रेंगाळलेलं आहे. त्याला जरा वेग द्यायला पाहिजे असं देखील मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं.