शिखर शिंगणापूर : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्यपूर्व काळात दुष्काळी भागातील जनतेला शेतीसह पिण्याचे उपलब्ध व्हावे या उद्देशाने सुमारे १५० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेला राजेवाडी तलाव अनेक वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरला आहे.
माणगंगा नदीवर बांधलेल्या राजेवाडी मध्यम प्रकल्पामुळे सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील ४ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली येत असल्याने राजेवाडी तलाव माणदेशातील दुष्काळी जनतेसाठी वरदान ठरला आहे. अनेक वर्षानंतर राजेवाडी तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने दुष्काळी भागातील पर्यटकांसाठी राजेवाडी तलाव परिसर आकर्षण ठरत आहे.
हेही वाचलंत का?