सातारा : येणकेतील बिबट्या अखेर सापळ्यात | पुढारी

सातारा : येणकेतील बिबट्या अखेर सापळ्यात

कराड : पुढारी वृत्तसेवा : येणके (ता. कराड) येथील परिसरात लावलेल्या सापळ्यात शुक्रवारी रात्री बिबट्या भक्ष्याच्या शोधात आल्यानंतर सापडला. काही दिवसांपूर्वी एका ऊसतोड मजुराच्या पाच वर्षांच्या मुलावर हल्ला करून बिबट्याने त्याचा बळी घेतला होता. त्यामुळे येणकेसह परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

येणके येथे 15 नोव्हेंबरला सकाळी पाच वर्षाच्या मुलाचा बळी गेल्यानंतर येणके ग्रामस्थ, शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होता. वारंवार मागणी करूनही बिबट्याला न पकडणाऱ्या वनविभागाबाबत स्थानिकांमध्ये प्रचंड रोष होता.

बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. मात्र बिबट्या सापडला नव्हता. त्यामुळे ग्रामस्थ दहशतीखाली वावरत होते. शुक्रवारी रात्री सापळ्यात लावलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला आणि बिबट्या अलगदपणे सापळ्यात अडकला.

हेही वाचलं का?

Back to top button