हुपरी चाेरी : चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिस ठाण्यासमोरीलचं मोबाईल शॉपी फोडली | पुढारी

हुपरी चाेरी : चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिस ठाण्यासमोरीलचं मोबाईल शॉपी फोडली

हुपरी : पुढारी वृत्‍तसेवा

हुपरी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घतला आहे. आज (शनिवार) हुपरीच्या मुख्य रस्त्याला लागून असलेली व पोलिस ठाण्याच्या अगदी समोर असलेली मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी मोबाईल आणि रोख रक्कम लंपास केल्याची शक्यता आहे. त्यामुळे हुपरी परिसरात व्ययसाईकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

काल पट्टणकोडोली येथे दोन घरफोड्या झाल्या होत्या. आज सकाळी फिरायला गेलेल्या लोकांच्या निदर्शनास ही बाब आली. मुख्य रोड आणि पोलिस ठाणे समोर असताना चोरट्यांनी अत्यंत धाडसाने ही मोबाईल शॉपी फोडल्याची चर्चा आहे. दुकानातील रोख रक्कम आणि मोबाईल त्यांनी लंपास केल्याचा अंदाज आहे. शॉपिंचे शटर उचककटून ही धाडसी घरफोडी झाली. चोरट्यांनी हुपरी परिसरात हैदोस घातला आहे. शहरात इतरत्र आणि छोट्या मोठ्या चोरीच्या घटना घडल्या असल्याची माहिती असून पोलिस अद्याप घटनास्थळावर आले नव्हते.

Back to top button