सातारा : एसटी नसल्‍याने विद्यार्थ्यांचे भर पावसात आंदोलन | पुढारी

सातारा : एसटी नसल्‍याने विद्यार्थ्यांचे भर पावसात आंदोलन

सातारा ; पुढारी वृत्‍तसेवा शालेय विद्यार्थ्यांना एसटी नसल्याने भर पावसात विध्यार्थी रस्त्यावर आंदोलनाला बसले. एसटी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका विध्यार्थ्यांना बसला.

साताऱ्यात औंध शाळेतील विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध झाली नाही. रात्री 9 वाजले तरी औध बस स्थानकात विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागले. यावेळी संतप्त विध्यार्थ्यांनी भर पावसात आणि रात्रीच्या अंधारात रस्त्यावर ठिय्या मांडत आपल्या भावना व्यक्त केल्‍या. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत एसटी प्रशासनाविरोधात राग व्यक्त करण्यात आल्‍या.

बस स्थानकाच्या दारात बसून विद्यार्थ्यांनी रात्रीचं धरणे आंदोलन केल. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत विद्यार्थ्यांची समजूत काढत एसटी प्रशासनाला विध्यार्थ्यांच्या भावना कळवल्या. यावर विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी विद्यार्थ्यांची उद्यापासून गैरसोय होऊ देणार नसल्याची हमी फोनवरून दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

हेही वाचा : 

Back to top button