Stock Market Updates | संमिश्र जागतिक संकेत, सेन्सेक्स, निफ्टी सपाट | पुढारी

Stock Market Updates | संमिश्र जागतिक संकेत, सेन्सेक्स, निफ्टी सपाट

पुढारी ऑनलाईन : जागतिक संमिश्र संकेतांदरम्यान आज मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट पातळीवर खुले झाले. सुरुवातीच्या व्यवहारात बँकिंग आणि फायनान्सियल स्टॉक्समध्ये तेजी होती. पण आयटी स्टॉक्सनी निराशा केली. सेन्सेक्स आज ६६ हजारांवर खुला झाला होता. पण सकाळी १० च्या सुमारास सेन्सेक्स ३० अंकांनी घसरून ६५,९२२ वर आला. तर निफ्टी १९,६०० वर होता. (Stock Market Updates)

सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, विप्रो, एसबीआय, मारुती, टायटन, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, ॲक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स हे शेअर्स वधारले आहेत. तर पॉवर ग्रिड, एम अँड एम, सन फार्मा, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील, इन्फोसिस हे शेअर्स घसरले आहेत.

दरम्यान, आशियाई शेअर बाजारातही कमकुवत स्थिती आहे. जपानचा निक्केई निर्देशांक ०.३४ टक्के वाढून व्यवहार करत असून हाँगकाँगचा हँगसेंग १.३ टक्क्यांनी घसरला. तर चीनचा शांघाय कंपोझिट सुरुवातीच्या व्यवहारात सपाट झाला. (Stock Market Updates)

हे ही वाचा :

Back to top button