Karad Police : रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त, कराड शहर पोलिसांची कारवाई - पुढारी

Karad Police : रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त, कराड शहर पोलिसांची कारवाई

कराड: पुढारी वृत्तसेवा

रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून देशी बनावटीचे पिस्टल पोलिसांनी जप्त केले. कराडलगत पाटण रस्त्यावर साई ढाब्याजवळ गुरुवार दि. 28 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शहर पोलिसांनी ही कारवाई केली. सोमनाथ सूर्यवंशी (रा. ओगलेवाडी, ता. कराड) असे पिस्टल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील संशयित गुन्हेगाराचे नाव आहे. (Karad Police)

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, ओगलेवाडी येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार सोमनाथ सूर्यवंशी हा देशी बनावटीचे पिस्टल घेऊन पाटण रस्त्यावर आला असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना गोपनीय सुत्रांकडून माहिती समजली.

Karad Police : पोलीस निरीक्षक अमित बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

तात्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांना याबाबतची कल्पना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी पाटण रस्त्यावरती जाऊन संशयित सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर छापा टाकून त्याची झडती घेतली. या वेळी त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल सापडले.

पोलिसांचा अधिक तपास सुरू

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले असून पुढील कारवाई सुरू केली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांनी ते पिस्तूल आणले कुठून? कशासाठी आणले होते? पाटण रस्त्यावरती तो पिस्टल घेऊन का फिरत होता? याचा तपास पोलीस करत आहेत. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने स्वतःच्या सुरक्षेसाठी पिस्तुल बाळगले होते की कोणाचा गेम करायचा होता? याचाही पोलीस तपास करत आहेत.

Back to top button