Kiran Gosavi : किरण गोसावींना ८ दिवसांची पोलिस कोठडी
Kiran Gosavi : किरण गोसावींना ८ दिवसांची पोलिस कोठडी

Kiran Gosavi : किरण गोसावींना ८ दिवसांची पोलिस कोठडी

Published on

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच असलेले किरण गोसावी (Kiran Gosavi) यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. किरण गोसावी यांच्याविरोधात अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. गोसावी यांनी अनेक तरुणांना फसवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करायचा असल्याने किरण गोसावींना १० दिवसांची पोलिस कोठडी मिळावी अशी सरकारी वकिलांनी मागणी केली होती.

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच असलेले किरण गोसावी यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किरण गोसावी याच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. अखेर पुणे पोलिसांनी किरण गोसावी याला ताब्यात घेतले.

दरम्यान, एनसीबीचे वादग्रस्त पंच किरण गोसावीने शरणागती पत्करली नाही तर पुणे पोलिसांनी त्याला अटक केलीय. तो नाव बदलून राहायचा. किरण गोसावी याचा मागील १० दिवसांपासून विविध राज्यांत वावर होता, अशी महत्त्वाची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, पुण्यातील कात्रज येथील एका लॉजवरून मध्यरात्री साडे तीन वाजता त्याला पुणे पोलिसांनी अटक केलीय. नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकणी ही कारवाई केलीय. गोसावी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय.

मागील १० दिवसांपासून गोसावीचा विविध राज्यांमधून वावर होता. सचिन पाटील या नावाने तो राहत असे. तो एनजीओ आणि डिटेक्टीव्ह एजन्सीचा सदस्य असल्याचो सांगतो. ही प्राथमिक माहिती आहे. इतर तपास यंत्रणांनी त्याचा ताबा मागितला तर त्याचीही प्रक्रिया केली जाईल, असेही अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

गोसावींना अटक करण्यासाठी अनेक टीम बनवण्यात आल्या होत्या. पुढील बाब कोर्टात समजेल, अशीही माहिती त्यांनी दिलीय. दरम्यान, यापूर्वी पुणे पोलिसांनी त्याच्या महिला मॅनेजरला अटक केली आहे. शेरबानो मोहम्मद इरफान कुरेशी (वय २७, रा. गोवंडी, मुंबई) असे तिचे नाव आहे. किरण गोसावी याचा आर्यन खानबरोबरचा फोटो व्हायरल केल्यानंतर तो चर्चेत आला होता. त्यानंतर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल असून त्या तो फरार असल्याचे समोर आले होते.

किरण गोसावी विरोधात २०१८ मधे गुन्ह्याची नोंद आहे. त्याच्याविरोधात एप्रिल २०१९ मधे चार्जशीट पाठवण्यात आली. किरण गोसिवीची सेक्रेटरी शेरबानो कुरेशी हीच्या अकांउटमधे चिन्मय देशमुखने तीन लाख रुपये पाठवले होते. मात्र, शेरबानो कुरेशीचे हे अकांउट किरण गोसावी बनावट कागदपत्रांच्या आधारे वापरत होता. पैसै परत मागितल्यावर त्याने चिन्मय देशमुखला धमकी दिली आणि शिवीगाळ केली. किरण गोसावी विरुद्ध ठाणे, कळवा, अंधेरी, पालघर अशा अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत.

त्याचा शोध घेण्यासाठी ३ पथके तयार करण्यात आली होती. त्याचा शोध घेत असताना तो लखनौ येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पुणे पोलिसांचे पथक लखनौला पोहोचले होते. परंतु, हे पथक पोहोचण्यापूर्वीच किरण गोसावी तेथून पळून गेला होता.

किरण गोसावी याच्याविरुद्ध पुण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात, चिन्मय देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. किरण गोसावी याने आपल्या फेसबुकवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून ३ लाख रुपये घेऊन किरण गोसावी याने मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी नदिल्याने तो भारतात परत आला. त्यानंतर त्यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली होती.

आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला…

किरण गोसावी पोलिसांना गेल्या १५ दिवसांपासून गुंगारा देत होता. अखेर, पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news