Kolhapur Bribe : कोल्हापूर की लाचपूर? आठवड्यात दुसऱ्यांदा ५ हजारांची लाच घेताना सापडला | पुढारी

Kolhapur Bribe : कोल्हापूर की लाचपूर? आठवड्यात दुसऱ्यांदा ५ हजारांची लाच घेताना सापडला

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना येथील सार्वजनिक बांधकाम खात्यातील कनिष्ठ लिपिक जेरबंद राजेश प्रकाश खाडे (वय ३६) राहणार रमणमळा कोल्हापूर असे त्याचे नाव आहे. तक्रारदार रविराज सावंत यांच्या वडिलांचे काही महिन्यापूर्वी निधन झाल्याने त्यांची पेन्शन आईच्या नावावर करण्यासाठी खाडे याने पाच हजार रुपयाची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधिक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सापळा रचून खाडे याला अटक केली. (Kolhapur Bribe)

दरम्यान काल (दि.२७) रोजी शाहुपूरी स्थानकाच्या आवारातच लाच घेताना एकाला अटक करण्यात आले आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्याचा अंमलदार म्हणून कर्तव्यावर असताना 5 हजाराची लाच घेताना पोलिस कॉस्टेबल रंगेहाथ सापडला. सागर इराप्पा कोळी (रा.उचगाव ता.करवीर) असे संशयितांचे नाव आहे. (Kolhapur Bribe)

तक्रारदारची वादातील इनोव्हा गाडी परत मिळवून देणेकरिता सोमवारी १० हजार रुपये घेतले होते. तर आणखी ५ हजार रुपये घेऊन तक्रारदाराला मंगळवारी रात्री बोलावले होते. मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास ही लाचेची रक्कम घेताना त्याला पकडण्यात आले.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मोरे, संजीव बम्बर्गेकर, अजय चव्हाण, कृष्णात पाटील, रुपेश माने यांच्या पथकाने कारवाई केली.

पोलिस ठाण्यातच घेतली लाच

संशयित सागर कोळी यांच्याकडे रात्री ९ नंतर ठाणे अंमलदार पदाची जबाबदारी होती. तक्रारदाराला त्याने पोलिस ठाण्यात गर्दी कमी असताना म्हणजे रात्री १२ नंतर बोलावून ही लाच स्वीकारली.

Back to top button