

सातारा ; पुढारी वृत्तसेवा गुरुवारी बकरीईद आहे. त्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित बाजार म्हणून ओळखला जाणाऱ्या व महामार्गावरील महत्वपूर्ण असलेल्या पाचवड येथील जनावरांच्या बाजारात बकरी खरेदीसाठी व्यापारी व नागरिकांनी गर्दी केली होती. यामध्ये सर्वसामान्य खरेदीदार यांनी पांच हजार रूपयांपासून पन्नास हजार रुपयांपर्यंत बकऱ्यांच्या वयोमानानुसार किमती ठरल्या, एक वर्षापुढील बकरी 30 ते 40 हजार रुपयांची किंमत होऊन व्यवहार झाले.
कोरोना महामारीत नंतर सुरू झालेल्या या जनावरांच्या बाजारावर रोगराईचे संकट आल्याने आजही इतर गाई, म्हैशी, बैल या जनावरांची खरेदी विक्री व्यवहार होत नसल्याने पांचवडच्या बाजारात ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत नसल्याची खंत मार्केट कमिटीचे संचालक व व्यापारी संघटनेचे नेते दत्ताशेठ बांदल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वाई तालुक्यातील शेतकरी वर्गाची सूचना स्वीकारून वाई येथे मार्केट कमिटीने दिवसातून दोन वेळा भाजी मंडई सुरू केली. याचाही लाभ शेतकरी बंधू व व्यापाऱ्यांना घेण्याचे आवाहन केले.
हेही वाचा :