Encounter in J&K: जम्मू काश्मीरमध्ये चकमक; दहशतवादी ठार | पुढारी

Encounter in J&K: जम्मू काश्मीरमध्ये चकमक; दहशतवादी ठार

पुढारी ऑनलाईन: जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज (दि.२७ जून) झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. दरम्यान याठिकाणाहून सुरक्षा दलाकडून शस्त्रास्त्र आणि दारूगोळा यासह आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. दरम्यान सैन्यदलाकडून परिसरात शोधमोहीम (Encounter in J&K) सुरू आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

यापूर्वीच्या कारवाईत, चार दहशतवाद्यांचा खात्मा

यापूर्वी कुपवाड्यातील मछल सेक्टरमधील काला जंगलमध्ये भारतीय लष्कर आणि पोलिसांकडून मोठी कारवाईत करण्यात आली होती. या संयुक्त कारवाईत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले होते. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधून (PoJK) भारतात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधी भारतीय लष्कराकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा:

Back to top button