साताऱ्यात ऑक्सिजन येतो तो उदयनराजेंमुळे; शिवेंद्रराजे यांचा टोला | पुढारी

साताऱ्यात ऑक्सिजन येतो तो उदयनराजेंमुळे; शिवेंद्रराजे यांचा टोला

सातारा : पुढारी वृत्तसेवा

खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात DCC बँक आणि पालिकेवरून वाद वाढला आहे. आज (दि. २६) खासदार उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर सहकारी संस्था मोडकळीस काढल्या अशी अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी १० तारखेपर्यंत अर्ज माघारी घ्यावे, असे आवाहन केलं. यावर बोलताना आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, त्या संस्थेच्या निवडणुकीला येऊन त्यांनी बोलावे ही संस्था चांगली चालली आहे आणि चालवली आहे, असे शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.

खासदार उदयनराजेंना पॅनलमध्ये घेणार का? या प्रश्नावर शिवेंद्रराजे यांना विचारले असता ते म्हणाले. मीच पॅनलमध्ये आहे हे मलाच माहीत नाही. पॅनलचा निर्णय शरद पवार, अजित पवार घेतील त्यांना त्यांनी बोलावं, असे सांगत आपल्या साताऱ्याला ऑक्सिजनचा पुरवठा देवाकडून बंद होणार होता तो मीच सुरू केला आहे, असे स्टेटमेंट उदयनराजेंकडून येईल अशी टिचकी वाजवत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंना टोला लगावला आहे.

दरम्यान, सातारा जिल्हा बँकेची (Satara District Bank Election ) रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी खा. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या पारंपरिक गृहनिर्माण मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यासोबत भाजप आ. शिवेंद्रसिंहराजे भोसलेसोबत ना. रामराजे, ना. निकबळकर यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला.

सातारा जिल्हा बँकेसाठी ( Satara District Bank Election ) सोमवारी (दि. २५) रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे जिल्हा बँकेत नेते आणि पदाधिकाऱ्यांनी सकाळपासूनच गर्दी केली. सकाळी ११ वाजण्यापूर्वीच खासदार उदयनराजे भोसले बँकेत दाखल झाले होते.

सातारा जिल्हा बँकेसाठी शेवटच्या दिवशी अर्ज दखल करण्याची झुंबड उडाली. विधान परिषद सभापती ना. रामराजे, ना. निकबळकर हे बँकेत आल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आणि भाजप आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात बैठक झाली. ही बैठक सुमारे १ तास सुरू होती. ही बैठक संपल्यानंतर सर्व नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

 

 

Back to top button