satara district bank : सातारा जिल्हा बँकेसाठी 21 नोव्हेंबरला मतदान | पुढारी

satara district bank : सातारा जिल्हा बँकेसाठी 21 नोव्हेंबरला मतदान

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा बँकेचा (satara district bank) निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. त्यानुसार सोमवार, दि. 18 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 21 नोव्हेंबर रोजी 21 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये सोसायटी मतदार संघात चुरस असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

सातारा जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी 4 रोजी जाहीर झाली होती. परंतु कोल्हापूर आणि पुणे बँकेसंदर्भात उच्च न्यायालय याचिका दखल झाल्यामुळे सातारा जिल्हा बँकेचा (satara district bank) निवडणूक कार्यक्रम लांबला होता. अखेर शनिवारी तो जाहीर झाला. सोमवारपासून हा निवडणूक कार्यक्रम सुरू होत आहे. दि. 18 ते 25 अर्ज दाखल करणे. 26 ऑक्टोबर रोजी अर्ज छाननी, आणि 27 रोजी उमेदवार यादी प्रसिद्ध होणार आहे.

27 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. 11 नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 5 या वेळेत मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

Back to top button