Satara District Bank Election: उदयनराजे भोसलेंसह शिवेंद्रसिंहराजेंचा अर्ज दाखल | पुढारी

Satara District Bank Election: उदयनराजे भोसलेंसह शिवेंद्रसिंहराजेंचा अर्ज दाखल

सातारा; पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा बँकेची ( Satara District Bank Election ) रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी खा. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या पारंपरिक गृहनिर्माण मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यासोबत भाजप आ. शिवेंद्रसिंहराजे भोसलेसोबत ना. रामराजे, ना. निकबळकर यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला.

सातारा जिल्हा बँकेसाठी ( Satara District Bank Election ) सोमवारी (दि. २५) रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे जिल्हा बँकेत नेते आणि पदाधिकाऱ्यांनी सकाळपासूनच गर्दी केली. सकाळी ११ वाजण्यापूर्वीच खासदार उदयनराजे भोसले बँकेत दाखल झाले होते.

याच दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यास थोडा वेळ असल्याने त्यांनी सीईओ राजेंद्र सरकाळे यांच्याशी विविध मुद्द्यावर चर्चा केली. कामकाजास सुरूवात होताच ११ वाजता उदयनराजे यांनी जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर ते शासकीय विश्राम गृह येथे गेले.

रामराजे, बाळासाहेब पाटील आणि शिवेंद्रराजे यांच्यासह विद्यमान संचालकांचे अर्ज दाखल

सातारा जिल्हा बँकेसाठी शेवटच्या दिवशी अर्ज दखल करण्याची झुंबड उडाली. विधान परिषद सभापती ना. रामराजे, ना. निकबळकर हे बँकेत आल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आणि भाजप आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात बैठक झाली. ही बैठक सुमारे १ तास सुरू होती. ही बैठक संपल्यानंतर सर्व नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

यामध्ये ना. रामराजे, ना. निंबाळकर, सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, नितीनकाका पाटील आणि शिवरूप राजे खर्डेकर, अनिल देसाई या विद्यमान संचालकांचा समावेश आहे.

अर्ज दाखल केल्यानंतर या नेत्यांनी बँकेत आपला ठिय्या मांडला. पुन्हा या नेत्यांची निवडणुकीसंदर्भात संचालक मंडळ सभागृहात बैठक झाली. या बैठकीत खा. उदयनराजे यांना पॅनलमध्ये घ्यायचे की नाही? यावर चर्चा झाली असल्याचा माहिती समजली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button