सातारा : केळघर घाटात दरड कोसळली | पुढारी

सातारा : केळघर घाटात दरड कोसळली

सातारा; पुढारी वृत्तसेवा : केळघर घाटात आज सकाळी पावसामुळे दरड कोसळली. त्यामुळे सातारा केळघर मार्गे महाबळेश्वरला जाणाऱ्या वाहनचालकांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनकडून करण्यात आले आहे.

महाबळेश्वर-केळघर परिसरात मान्सूनने जोर धरला असून सरीवर सरी बरसत आहेत. उन्हाळ्यात घाटातील मुरमाड दरडी तापल्यामुळे पहिल्या पावसात दरडी कोसळण्यास सुरुवात होते. आज सकाळी म्हसोबाचा ओढा (रेंगडी ता. जावली ) या शिवारात रस्त्यात दरड कोसळल्यामुळे एका बाजूची वाहतूक बंद होती. याबाबत माहिती मिळताच सर्कल उमेश डोईफोडे व तलाठी ढाकणे यांनी तानाजी पार्टे यांच्या जेसीबीच्या सहाय्याने दगड, माती हटवण्यात आली. त्यानंतर या मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

हेही वाचा : 

Back to top button