जळगाव : गुरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह दोघेजण ताब्यात | पुढारी

जळगाव : गुरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह दोघेजण ताब्यात

जळगाव; पुढारी वृत्तसेवा:  मध्य प्रदेशातून औरंगाबाद येथे गुरांची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला . विनापरवाना वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये सुमारे ५० गुरे होती. यात दोघांना ताब्यात घेतले असून ४५ गुरांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

पोलिस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, मध्य प्रदेशातून गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक (एमपी १७ एचएच १८०३)  जात होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पाल पोलिस चौकीचे पॉ. हे. कॉ. राजेंद्र राठोर, पो. कॉ. नरेंद्र बाविस्कर, पो. कॉ. दिपक ठाकुर, पोलीस नाईक अतुल तडवी, पो. कॉ. संदीप धनगर यांनी सापळा रचून हा ट्रक पकडला. यानंतर सुमारे ४५ जिवंत गुरांची सुटका करण्यात आली. तर यावेळी ट्रकमध्ये चार मृत गुरे सापडली असल्याची प्राथमिक माहिती आहे

. हा ट्रक औरंगाबाद येथे कत्तलीच्या फॅक्टरीत जात असल्याचे उघड झाले आहे. ट्रक चालक नसीम खान अकबर खान (वय २७) झुबेर खान रफीक खान (वय २१) (रा. करमेळी, जि. विदिशा, मध्य प्रदेश) या दोघांना ताब्यात घेतले आहे. ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून गुरांना जळगाव बाफना गौ-शाळेत रवाना करण्यात येणार आहे. ही कारवाई आज पहाटे ५ वाजता करण्यात आली असून, याबाबत पशुप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. मध्य प्रदेशकडून मोठ्या प्रमाणात अवैध गुरांची तस्करी होत असते याचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी पशुप्रेमींनी केली आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : अद्भूत पश्चिम घाट

Back to top button