ITBP : ‘आयटीबीपी’च्या नवीन बटालियनला लवकरच मंजुरी ! | पुढारी

ITBP : 'आयटीबीपी'च्या नवीन बटालियनला लवकरच मंजुरी !

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

भारत-चीन सीमेच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) सुरक्षेच्या अनुषंगाने भारत-तिबेट सीमा पोलीसांच्या (ITBP) नवीन बटालियनला मंजुरी देण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. सरकार सुरक्षा दलांना परिवहन आणि रसद पुरवण्याकरीता कटीबद्ध आहे, अशी माहिती केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांनी दिली आहे.
आयटीबीपी च्या ६० व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करतांना राय म्हणाले की, केंद्राने गेल्या वर्षी ४७ नवीन सीमा चौकी तसेच १२ हुन अधिक ऑपरेशनल बेस कॅम्प ला मंजुरी दिली आहे. आयटीबीपी साठी मनुष्यबळ तसेच बटालियन उपलब्ध करवून देण्यासंबंधी प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असल्याचे ते म्हणाले.
आयटीबीपीच्या (ITBP) नवीन चौकीसाठी जवळपास ८ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या ७ नवीन बटालियन ला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या नवीन बटालियन प्रामुख्याने पूर्वेकडील सीमांवर एलएसी च्या अरुणाचल प्रदेश सेक्टर वर तैनात करण्यात येतील. आयटीबीपी च्या नवीन बटालियन तसेच पूर्वेत्तर भागात एक सेक्टर मुख्यालय उभारणीचा प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाकडे गत दोन वर्षान पासून प्रस्तावित आहे. परंतु, गेल्या वर्षी नवीन सीमा चौकी तसेच बेस कॅम्प आयोजनाला परवानगी देण्यात आल्याने या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचलं का ?

Back to top button