

वाई, पुढारी वृत्तसेवा: वाई तालुक्याच्या पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतमालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बागायती शेतातील भाजीपाला मातीमोल झाला आहे. अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जाहिरातीचे फलक रस्त्यावर कोसळले आहेत. नागरिकांची अवकाळी पावसाने चांगलीच तारांबळ उडाली.
गेले चार दिवस वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. तसेच वातावरणही ढगाळ झाले होते. घराबाहेर पडलेल्या नागरिकांची पावसाने त्रेधा उडवली. काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस पडत असल्याने भूस्खलन होण्याची भीती निर्माण व्यक्त केली जात आहे. अतिवृष्टीच्या खुणा अजूनही ताज्या असल्याने वाई तालुक्यातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.
हेही वाचा