आम्ही पक्षात काय करतो हे राऊतांना माहिती नाही, ‘सामना’मधील टीकेला पवारांचं उत्तर (Video) | पुढारी

आम्ही पक्षात काय करतो हे राऊतांना माहिती नाही, 'सामना'मधील टीकेला पवारांचं उत्तर (Video)

सातारा : पुढारी ऑनलाईन डेस्क – मला लोकांनी थांबू दिले नाही. आणखी जोमाने काम करणार. आम्ही पक्षात काय करतो हे राऊतांना माहिती नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘सामना’मधील टीकेला उत्तर दिलं.

रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला पवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन केले.

सामनातून झालेल्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिलं. शरद पवार म्हणाले- अग्रलेखाचं महत्त्व आमच्या लेखी काही नाही. आम्ही सामनाच्या अग्रलेखाला महत्त्व देत नाही. आम्ही आमचं काम करतो, त्यांना काहीही लिहू दे. राष्ट्रवादीत काय होतं, हा आमचा प्रश्न आहे.

आम्ही काय केलं हे त्यांना माहिती नाही. आम्ही काय करतो हे आम्हाला ठाऊक आहे. शब्दांचा खेळ करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न आहे. आम्हाला शून्यापासून सुरुवात करायची आहे. यावेळी चव्हाणांच्या आरोपावर शरद पवार यांनी उत्तर दिलं.

पृथ्वीराज चव्हाणांचं काँग्रेसमधील पत काय आहे? हे आधी पहा असे शरद पवार यांनी चव्हाणांच्या आरोपावर उत्तर दिलं.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पक्षाचा वारसदार ठरविण्यात अपयश आल्याची टीका दैनिक सामनाच्या अग्रलेखातून (Sanjay Raut On Sharad Pawar) करण्‍यात आली होती.

सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत यांनी म्हटले होते की, शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’ असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. मात्र, शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढं नेणारं नेतृत्व पक्षात उभं राहू शकलं नाही. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते असून त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान आहे. असं असलं तरी पक्ष पुढं नेईल, असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत.

Back to top button