पैठण : आंघोळीचा व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन महिलेवर अत्‍याचार | पुढारी

पैठण : आंघोळीचा व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन महिलेवर अत्‍याचार

पैठण पुढारी वृत्तसेवा:– एका महिलेचा आंघोळ करताना बनविलेला व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन एका व्यक्‍तीने वारंवार अत्याचार केल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. सदरील आरोपीविरुद्ध विहामांडवा येथील पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील एका व्यक्‍तीने महिला आंघोळ करीत असताना व्हिडिओ काढून तो प्रसारित करण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ करून पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केला. हा प्रकार दि.२८ जानेवारी २०२२ ते ८ मे रोजी पर्यंत घटना घडल्याची तक्रार पीडित महिलेने विहामांडवा पोलीस चौकीत दिली.

पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांनी अत्याचार करणाऱ्या संशयिता विरुद्ध पोस्को कलामानुसार गुन्हा दाखल करून पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष माने यांच्याकडे वर्ग केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button