सातारा : कोयना धरण परिसरात तीन रिश्टर स्केलचा भूकंप | पुढारी

सातारा : कोयना धरण परिसरात तीन रिश्टर स्केलचा भूकंप

पाटण : पुढारी वृत्तसेवा आज (रविवार) पहाटे ३.५३ वाजता कोयना धरण परिसरात तीन रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणाच्या उत्तरेस 50 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन केंद्राकडून देण्यात आली.

हा भूकंप कोयनेसह पाटण व चिपळूण तालुक्यात काही ठिकाणी जाणवला. या भूकंपात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. भूकंपाची खोली तीस किलोमीटर अंतरावर होती. मध्यरात्री अचानकपणे जाणवलेल्या भूकंपामुळे गाढ झोपत असलेले स्थानिक लोक घाबरून घराबाहेर पडले होते.

हेही वाचा :  

Back to top button