सातारा : पर्यटननगरीस ”बहर” सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरले | पुढारी

सातारा : पर्यटननगरीस ''बहर'' सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरले

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे नंदनवन म्‍हणून ओळख असलेले थंड हवेचे ठिकाण म्‍हणून महाबळेश्वरला पर्यटकांची पसंती असते. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर बहरले असून हजारो पर्यटक या पर्यटननगरीमध्ये थंड आल्हाददायक वातावरण आणि पर्यटनाचा आनंद लुटताना पाहावयास मिळत आहेत.

सलग सुट्या अन् आणि महाबळेश्वर हे पर्यटकांसाठी समीकरणचं बनलं आहे. सौंदर्यांने नटलेला निसर्ग पाहण्यासाठी मुंबई, पुण्यासह विविध ठिकाणांवरून पर्यटक येथे दाखल होत आहेत. शनिवार, रविवार आणि कामगार दिनानिमित्त सलग सुट्या लागल्याने धकाधकीच्या जीवनातून विसावा घेण्याबरोबरच निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी महाबळेश्वरला पर्यटकांची रेलचेल सुरू आहे.

वेण्णालेक हे महाबळेश्वर पर्यटनाचे आकर्षक स्थळ आहे. वेण्णालेक येथे सायंकाळी सुर्यास्तावेळी पर्यटकांची मांदियाळी अनुभवायास मिळाली असून वेण्णालेक चौपाटीवर घोडेस्वारी नौकाविहारासह  महाबळेश्वरी खाद्यपदार्थांची मेजवानी असा जत्रेचा माहोल सर्वत्र दिसत आहे.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button