

पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण पाचगणी – वाई घाटात दांडेघरजवळ चालकाचा ताबा सुटल्याने सुमारे 150 फूट दरीत कार कोसळली. हा अपघात आज (दि.३) दुपारी ३ च्या सुमारास झाला. पीयूष कारिआप्पा हा चालक बालबाल बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघाताची नोंद पाचगणी पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाई घाटात पाचगणीहून वाईच्या दिशेने (एमएच १२ एफ एफ 6865) ही कार आज दुपारी तीनच्या सुमारास जात होती. यावेळी दांडेघर गावाच्या हद्दीत ब्लुमिंग डेल शाळेजवळच्या खालच्या बाजूला असणाऱ्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला धडकवली. परंतु, कार कठडा तोडून सुमारे 150 खोल दरीत कोसळली. चालक कारसह दरीत कोसळला. मात्र, चालकाने सीट बेल्ट लावल्यामुळे तो बालबाल बचावला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व सह्याद्री ट्रेकर्सचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरीतून चालकाला सुखरूप बाहेर काढले.
अपघातस्थळी पोलीस दाखल झाले असून क्रेनच्या साहाय्याने कार वर काढण्याचे काम चालू आहे. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती.
हेही वाचा