छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर पडल्याने समाजात दुफळी : उदयनराजे भोसले 

File Photo
File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : समाजात कारण नसताना भेदभाव केले जात आहेत तसेच राजकारणात फोफावलेली घराणेशाही पाहता आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे खरंच अस्तित्व राहील आहे का? असा प्रश्न खा. उदयनराजे भोसले यांनी आज उपस्थित केला. राजेशाहीनंतर लोकशाही अस्तित्वात आली, पण या लोकशाहीतील राजांनी केल तरी काय? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी खा. उदयनराजे पुढे म्हणले, संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराज असे एकमेव राजे होते, ज्यांना राजेशाही काळामध्येसुद्धा वाटत होते की, स्वराज्यातील जनतेचा राज्यकारभारात सहभाग असावा. पण सध्या लोकशाहीमध्ये सुद्धा घराणेशाही निर्माण झाल्या आहेत. घरणेशाहीमद्धे फक्त याच घराण्यातील लोकांना काय ते ज्ञान आहे इतर अज्ञानी आहेत असाच समज निर्माण करण्यात आला आहे. महात्मा गांधींना सुद्धा हे मान्य नव्हते, ते सत्तेच्या विकेंद्रीकरणावर विश्वास ठेवणारे होते. आज आपण याउलट बघत आहोत, घराणेशाहीमुळे सत्तेचे केंद्रीकरण झाले आहे. इतिहासात आपण मुघलांच्या, आदिलशाहीच्या अधिपत्याखाली राहत होते आता या निवडून दिलेल्या नेत्यांच्या अधिपत्याखाली राहत आहेत.

राजकारणात प्रत्येकजण स्वार्थ साधत आहेत. असेच राजकारण चालले तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. छत्रपतींच्या विचारांचा विसर पडत आहे म्हणून ही परिस्थिती निर्माण होत आहे. देशाला महासत्तेकडे न्यायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुनः समाजात, राजकरण्यांत रुजायला हवेत. असे मत खा. उदयनराजे यांनी मांडले.

हे वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news