Ultra Cyclist : वेदांत नांगरे बनला अल्ट्रा सायकलिस्ट; सलग ६४३ किलोमीटर सायकलिंग | पुढारी

Ultra Cyclist : वेदांत नांगरे बनला अल्ट्रा सायकलिस्ट; सलग ६४३ किलोमीटर सायकलिंग

कराड : पुढारी वृत्तसेवा; इन्स्पायर इंडिया पुणे संस्थेने आयोजित केलेल्या ६४३ किलोमीटर पुणे ते गोवा सायकल स्पर्धेत (Ultra Cyclist ) वेदांत अभय नांगरे (वय २२) याने ही स्पर्धा दिवस-रात्र, सलग सायकल चालवून यशस्वी पूर्ण केली. त्यासाठी त्याला ३१ तास तीस मिनिटे इतका वेळ लागला. वाचा सविस्तर बातमी

अतिशय खडतर क्लिफ हँगर स्पर्धा 

संपूर्ण भारतामधून या स्पर्धेत ३२ सोलो स्पर्धकांनी व आठ रिले टीमनी भाग घेतला होता. अतिशय खडतर समजली जाणारी ही स्पर्धा पुणे, खंबाटकी, पसरणी, महाबळेश्वर, मेढा मार्गे सातारा, बेळगाव, एम.के. हुबळी, आंबोली, सावंतवाडी गोवा मार्गे पूर्ण होते. ही स्पर्धा डेक्कन क्लिफ हँगर या नावाने ओळखली जाते. दख्खनच्या पठारावरून ही स्पर्धा सह्याद्रीच्या डोंगरातून तसेच काहीशा घनदाट अशा जंगलातून, कड्यातून गोव्याच्या किनारपट्टीकडे जाते. या स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाच्या पाठीमागे कार सहित सपोर्टसाठी क्रू टीम असते, जी स्पर्धकाला त्याचे खाणे पिणे तसेच इतर देखभाल करत असते.

Ultra Cyclist : क्रू मेंबर घरचे

वेदांतचे क्रू मेंबर म्हणून त्याची आई कल्याणी नांगरे, वडील अभय नांगरे, बहीण कु. अपूर्वा नांगरे, नातेवाईक शुभम नांगरे व ऋतुराज माने होते. रायडरने प्रत्येक तासाला त्याच्या आवश्यकतेप्रमाणे काही ठराविक कॅलरीचा आहार घेणे अपेक्षित असते. क्रू टीम ती पूरवत असते. बेळगावच्या आसपास पाऊस पडायला सुरुवात झाली. परंतु, त्या पावसात सुद्धा थांबवले नव्हते. या स्पर्धेचा कट ऑफ टाईम हा ३८ तासांचा आहे. तसेच जर स्पर्धकाने ३२ तासाच्या आत ही स्पर्धा पूर्ण केली तर तो रॅम नावाच्या अमेरिकेतील स्पर्धेला पात्र होतो. ती स्पर्धा याहून कठीण आहे. ज्यामध्ये स्पर्धकाला बारा दिवसांमध्ये पाच हजार किलोमीटरचे अंतर अमेरिकेतील टोकावरून वेगवेगळ्या वातावरणाचा सामना करून दिवस- रात्र सायकल चालवून पूर्ण करायचे असते. आत्तापर्यंत भारतातील चार कोणत्या स्पर्धकांनी सायकल चालवणे जणांनी स्पर्धा पूर्ण केलेली आहे.

वेदांतच्या स्पर्धेकडे तसेच तयारीकडे खासदार श्रीनिवास पाटील सौ. रजनीदेवी पाटील व सारंग पाटील यांचे विशेष लक्ष होते. वेदांतचा सत्कार त्यांनी फेटा तसेच शाल श्रीफळ देऊन केला. या अगोदर म्हणजेच जुलै २०२२ मध्ये वेदांत नांगरे यांने आयर्न मॅन ही खडतर स्पर्धा धून स्वित्झर्लंड येथे यशस्वी पूर्ण केली होती.

युवक, युवतींनी आपला कम्फर्ट झोन सोडून आवडीच्या क्षेत्राकडे यावे. ज्यामुळे आपल्या क्षमतांचा विकास होऊ शकेल. तसेच अनेक कठीण चॅलेंजेसला सामोरे जाण्याची क्षमता तयार होवू शकेल. -वेदांत नांगरे

हेही वाचा 

 

Back to top button