इंदिरानगरातील जळीतग्रस्तांसाठी तात्पुरत्या निवार्‍याची व्यवस्था करू : आ. ऋतुराज पाटील | पुढारी

इंदिरानगरातील जळीतग्रस्तांसाठी तात्पुरत्या निवार्‍याची व्यवस्था करू : आ. ऋतुराज पाटील

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी पार्क परिसरातील इंदिरा नगर झोपडपट्टीत मंगळवारी लागलेल्या भीषण आगीत 22 झोपड्या जळून खाक झाल्या. या जळीतग्रस्तांच्या घरांबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आ. सतेज पाटील, आ. जयश्री जाधव यांच्यासोबत महानगरपालिका अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊ. मात्र, तोपर्यंत तातडीने तात्पुरत्या शेड उभारून या लोकांच्या निवार्‍याची व्यवस्था करू, असे आश्वासन आ. ऋतुराज पाटील यांनी दिले.

शिवाजी पार्कमधील भीषण आगीत प्रापंचिक साहित्यासह जळून खाक झालेल्या झोपड्यांतील कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. लहान मुलांसह महिला, पुरुष मिळेल तेथे निवारा घेत आहेत. आ. ऋतुराज पाटील यांनी गुरुवारी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. सर्व कुटुंबीयांची विचारपूस करून समस्या जाणून घेतल्या. 1972 पासून झोपडपट्टी अस्तित्वात असल्याचे सांगून पक्क्या घरांची मागणी जळीतग्रस्तांनी केली. यावेळी सोनझारी समाजाचे अध्यक्ष मारुती सोनझारी, सामाजिक कार्यकर्ते तानाजी मोरे, रोहित जाधव, सुरेश सोनझारी, बाजीराव सोनझारी, शिवाजी सोनझारी, मनोज सोनझारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
Back to top button