कराड : वनवासमाचीत शेतात आढळलेल्या एका पिल्लाला बिबट्या घेऊन गेला; दोन पिल्ले वनविभागाच्या ताब्यात सुरक्षित | पुढारी

कराड : वनवासमाचीत शेतात आढळलेल्या एका पिल्लाला बिबट्या घेऊन गेला; दोन पिल्ले वनविभागाच्या ताब्यात सुरक्षित

कराड : पुढारी वृत्तसेवा : वनवासमाची तालुका कराड गावच्या हद्दीत स्मशानभूमीच्या बाजूस उसाच्या शेतात ऊस तोडणी कामगारांना बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली होती. त्यापैकी एका पिल्लाला त्यांची आई मादी बिबट्या मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घेऊन गेली आहे.

दरम्यान, राहिलेली दोन पिल्ले वन विभागाच्या ताब्यात सुरक्षित असून त्यांना त्याच ठिकाणी उसाच्या शेतात कॅरेटमध्ये ठेवण्यात आले आहे. ताटातूट झाल्याने पिल्लांच्या ओढीने मादी बिबट्या जास्त रागीट होऊ नये म्हणून ती पिल्ले मादी बिबट्याने घेऊन जावीत यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. सापडलेल्या ठिकाणी उसाच्या रानात पुन्हा एका क्रेटमध्ये त्यांना ठेवले. पिल्लांचे मूत्र हे रानात विविध ठिकाणी मादीला पिलांचा वास यावा म्हणून शिंपडले आहे.

.हेही वाचा 

नाशिक : त्र्यंबकच्या आधारतीर्थ आश्रमात 4 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू

सोनाली फोगाट खून प्रकरणी दोघांविरोधात आरोपपत्र दाखल

औरंगाबाद : कन्नड येथे राज्यपाल कोश्यारी आणि त्रिवेंदींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; बंदला संमिश्र प्रतिसाद

 

Back to top button