औरंगाबाद : कन्नड येथे राज्यपाल कोश्यारी आणि त्रिवेंदींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; बंदला संमिश्र प्रतिसाद | पुढारी

औरंगाबाद : कन्नड येथे राज्यपाल कोश्यारी आणि त्रिवेंदींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; बंदला संमिश्र प्रतिसाद

कन्नड; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबाद जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंदला कन्नड शहरात संमिश्र तर ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी शिवप्रेमी व स्व. रायभानजी जाधव विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्रिवेदी व राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला.

सुधांशु त्रिवेदी यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. “छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबला पाच वेळा माफीसाठी पत्र लिहिले होते,” असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर राज्यभरात त्यांच्या विरोधात मोठा संताप उसळला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या शिवरायांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ कन्नड शहरात दुकाने बंद ठेवण्यात आली. तसेच तालुक्यातील देवगाव, औराळासह अनेक गावांत त्रिवेदी आणि राज्यपाल कोशारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. औरंगाबाद शहरातील स्व.रायभानजी जाधव व्यापार संकुल पूर्णपणे बंद ठेवण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button