पुढारी ऑनलाईन डेस्क : संजय राऊत यांना बुधवारी जामीन मंजूर झाला. ईडीच्या कारवाईनंतर 31 जुलै रोजी त्यांना अटक करण्यात आले होते. बुधवारी (दि. 9 नोव्हेंबर) त्यांना जामीन मंजूर झाला. 102 दिवसांनंतर ते जेलमधून बाहेर आले आहेत. त्यांच्या बाहेर येण्याने आता शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केला आहे. जेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी पुस्तक लिहिणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या पुस्तकाचे नाव काय असणार याची चर्चा देखील सोशल मीडियावर जोरदार रंगली होती. (Sanjay Raut 102 Days)
संजय राऊत यांच्या नव्या पुस्तकाचे नाव 'आर्थरचे 101 दिवस' असे असे का? अशी चर्चा सोशल मीडियात सुरू आहे राऊत त्यांना अटक झाल्यापासून ते जामीन मिळेपर्यंत ते 101 दिवस जेलमध्ये होते. त्यानंतर 102 व्या दिवशी त्यांची सुटका झाली. जामीन झालेला दिवस सोडता ते 101 दिवस जेलमध्ये राहिले आहेत. त्यामुळे ते या पुस्तकाचे नाव 'आर्थरचे 101 दिवस' असे देतील का ? अशी चर्चा रंगली आहे. (Sanjay Raut 102 Day)
प्रत्यक्षात या पुस्तकाचे नाव काय असेल याबाबत लवकरच योग्य ती माहिती समोर येईल. संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर बुधवारी मिळालेल्या जामिनामुळे महाराष्ट्रातील राजकीय चर्चांना आता उधाण आलेले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या सुटकेचे मीम्स देखील जोरदार व्हायरल होत आहेत.
हेही वाचा