सातारा : ‘जागर स्वावलंबी शिक्षणाचा’ उपक्रमात जिल्ह्यातील शाळांचा उत्स्फूर्त सहभाग | पुढारी

सातारा : 'जागर स्वावलंबी शिक्षणाचा' उपक्रमात जिल्ह्यातील शाळांचा उत्स्फूर्त सहभाग

सातारा; पुढारी वृत्तसेवा : ‘दैनिक पुढारी’ च्या वतीने आयोजीत करण्यात आलेला ‘जागर स्वावलंबी शिक्षणाचा’ उपक्रम शनिवारी सातारा जिल्ह्यात उत्साहात संपन्न झाला. जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शाळांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने ‘वृत्तपत्र विक्रेता’ दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त शनिवारी प्रत्येक शाळेतील एका विद्यार्थ्याने दै. पुढारी अंकाचे वाटप करत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्वावलंबी शिक्षणाचा वसा आणि वारसा सर्व विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवला.

हेही वाचा :

Back to top button