IND W vs SL W T20 : भारतीय महिला संघाला ‘हा’ पराक्रम करण्याची संधी | पुढारी

IND W vs SL W T20 : भारतीय महिला संघाला 'हा' पराक्रम करण्याची संधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला आशिया चषक २०२२चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु झाला आहे. दोन्ही संघ पाचव्यांदा आशिया कपच्या अंतिम फेरीमध्ये आमने-सामने येत आहेत. भारताने या चषकावर सहावेळा आपली माेहर उमटवली आहे.  तर श्रीलंकेच्‍या संघाने चारवेळा अंतिम फेरीत धडक मारुनही चषकापासून वंचितच राहिली आहे. (IND W vs SL W T20)

गेल्या महिन्यात श्रीलंकेच्या पुरुष संघाने आशिया चषक टी-२० स्‍पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. मात्र श्रीलंकेचा संघ अद्याप महिला आशिया चषक जिंकू शकलेला नाही. आतापर्यंत सात वेळा महिला आशिया कपचे आयोजन करण्यात आले असून भारतीय संघाने तब्बल सहावेळा विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर बांगलादेशने २०१८ साली आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले होते. (IND W vs SL W T20)

श्रीलंकेच्या संघाने आत्तपर्यंत ४ वेळा आशिया चषकाचा अंतिम सामना खेळला आहे, मात्र, प्रत्येकवेळी त्यांना भारतीय संघाने पराभूत केले. त्‍यामुळे तब्‍बल सातवेळा या चषकांवर आपलं नाव काेरत नवा पराक्रम करण्‍याची संधी टीम इंडियाला आहे.

हेही वाचा;

Back to top button