कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीतील साताराच्या तिघांवर मोक्कांतर्गत कारवाई | पुढारी

कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीतील साताराच्या तिघांवर मोक्कांतर्गत कारवाई

सातारा; इम्तियाज मुजावर : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रूपयांच्या बदल्यात २० कोटींची मागणी करून व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गज्या मारणे याच्यासह १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आहे. यामध्ये तिघेजण सातारा येथील आहेत. नितीन पगारे (सातारा), प्रसाद उर्फ अमर शिवाजी किर्दत (वय ४६, रा. कोडोवली, जि. सातारा), फिरोज महंमद शेख (वय ५०, रा. समर्थनगर, कोडोवली, जि.सातारा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

गज्या मारणे याच्यावर ताळोजा तुरुंगातून सुटल्यानंतर मुंबई-पुणे महामार्गावर रॅली काढली होती. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्याला एक वर्ष स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यातून सुटल्यानंतर गेले काही दिवस शांत होता. आता पुन्हा त्याच्यावर सुपारी घेऊन मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) या टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली आहे. मारणे हा अद्याप फरार आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर करत आहेत.

या कारवाईनंतर साताऱ्यात एकच खळबळ माजली आहे. कुख्यात गुंड गजा मारणे याच्या गॅंगमध्ये साताराचे तिघे सापडल्याने साताऱ्यातही त्याची पाळेमुळे मजबूत रोवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सातारा पोलिसांपुढेही आता मारणे याच्या संपर्कात आणखी कोण कोण आहेत, हे शोधण्याचे आवाहन आहे.

हेही वाचा :

Back to top button