सातारा; पुढारी वृत्तसेवा : राजघराण्यानं रयत शिक्षण संस्थेला जागा दिली. पण ज्यांचे काहीही योगदान नाही, अशा लोकांना रयतमध्ये घेतलं जात आहे. रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण संस्था करा, अशी टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला. सातारा येथे त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
खासदार उदयनराजे म्हणाले की, राजमाता सुमित्राराजे भोसले यांनी रयत शिक्षण संस्थेला जागा दिली. अण्णा (कर्मवीर भाऊराव पाटील) आणि आज्जी (सुमित्राराजे) हे नेहमी समाजसेवेसाठी कार्यरत होते. आज या संस्थेचा पुर्वीचा हेतू राहिला नाही. रयतमध्ये राजकारण येऊ नये, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री हे पदसिद्ध असावेत असं होते. अचानक बदल झाला आणि 'हे' त्यात आले. ज्यांचे योगदान नाही त्यांना तुम्ही घेताय. रयत म्हणजे सर्वसामान्यांची संस्था आहे. रयतचं नाव बदलून टाका. ज्या कुटुंबाची संख्या जास्त आहे त्यांचे नाव द्या. पवार कुटुंबियांची संख्या जास्त आहे. त्यामुळे रयतचे नाव पवार शिक्षण संस्था करा, असा टोला उदयनराजेंनी लगावला.
हेही वाचा :