मुंबई;प्रकाश साबळे : राज्यात सत्तांतरानंतर मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मुंबई शहराकडे विशेष लक्ष देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून केले जात आहे. यासाठी मुंबईचे दोन टप्प्यांमध्ये सुशोभीकरण करण्याचा मानस या सरकारचा आहे. तशा महापालिका मुख्यालयात हालचाली सुरू झाल्या असून याकरिता महापालिकेतील एका उपायुक्त (विशेष) पदावर असलेल्या अधिकार्याकडे मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. या सुशोभीकरणाची सुरुवात ऐन दिवाळीत होणार असून त्यासाठी 1700 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
सुशोभीकरणाच्या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने रस्ते, पदपथ, दुभाजक, बस स्टॉप, समुद्रकिनारे, गार्डनसह विविध वास्तूंचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. अशा प्रकारे होणार सुशोभीकरण मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात ऑक्टोबर महिन्यापासून होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने 500 किमीचे रस्ते व दुभाजकांचे सौंदर्यीकरण, गार्डनमध्ये लाईटिंग, उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेचे सुशोभीकरण, स्कायवॉकखाली लाईटिंग व पेंटिंग, रस्त्यावर दिवाबत्ती, लाईटिंगची रोषणाई, ट ?ॅफिक आयलंड, पदपथाचे काँक्रिटीकरण, समुद्रकिनार्यांचे सुशोभीकरण व येणार्या पर्यटकांसाठी लेझर शो तसेच स्टार शौचालयाची उभारणी आदी कामांचा धूमधडाका सुरू होणार आहे, तर उर्वरित 50 टक्के कामाला मार्च महिन्यामध्ये सुरुवात होईल, अशी माहिती मुंबई सुशोभीकरण
प्रकल्पाचे विशेष उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली.
मुंबई शुभोभिकरण प्रकल्पासाठी सरकारने एक अजेंडा राबविला आहे. ज्या वास्तूचे किंवा पर्यटन स्थळाचे सुशोभिकरण व सौदर्यीकरण
करायचे असेल, तर विभागाकडूनच ते करून घेतले जाईल. अर्थात रस्ते विभागाचे काम रस्ते विभागच करणार तर गार्डनसाठी गार्डन
विभागच काम करेल. यासर्व कामासाठी वॉर्ड स्तरावर निविदा काढण्यात येणार आहेत. याकडे मुंबई महापालिका आयुक्त स्वत:ह लक्ष
घालणार असल्याने प्रत्येक काम चांगल्या पध्दतीने होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला.