सातार्‍यात नग्न युवकाचा धुडगूस

सातार्‍यात नग्न युवकाचा धुडगूस
सातार्‍यात नग्न युवकाचा धुडगूस

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा शहर परिसरातील पोवई नाका येथे एका युवकाने नग्न अवस्थेत धुडगूस घालत पळापळ केली. अचानक घडलेल्या या घटनेने नागरिक, महिलांची तारांबळ उडाली. सुमारे अर्धा तास नग्न युवक उड्या मारत राहिल्याने अखेर पोलिस व काही नागरिकांनी त्याला पकडून कपडे घालत सिव्हीलमध्ये दाखल केले.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, ही घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. एक युवक अंगावर कोणतेही वस्त्र न घालता पळत सुटला होता. वर्दळीच्या व मुख्य रस्त्यावर हा प्रकार सुरु झाल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी काही नागरिकांना हाताशी धरुन त्या युवकाला ताब्यात घेतले. संबंधित युवकाला कपडे घालून त्याच्यावर उपचार करण्यासाठी सिव्हीलमध्ये नेण्यात आले. दरम्यान, ही घटना घडत असताना बघ्यांची गर्दी उसळली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news