पिंपरी : मुली झाल्याने सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

पिंपरी : मुली झाल्याने सासरच्यांकडून विवाहितेचा छळ
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  मुली झाल्याने सासरच्यांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. हा प्रकार सन 2020 ते 23 ऑगस्ट 2022 या कालावधीत भोसरी आणि सावरगाव, ता. देवणी, जि. लातूर येथे घडला. पती रवींद्र यादव जांभुळकर (वय 35), सुनील बाबुराव गायकवाड, धनाजी केरूरकर, दर्शन धनाजी केरूरकर, दर्पण धनाजी केरूरकर, सुग्रीव भिवराव सूर्यवंशी आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना माहेरहून तीन लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच, दोन मुली झाल्यावरून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करून उपाशी ठेवले. तसेच, आरोपी पतीने मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगून विवाहितेला मारहाण करून त्रास दिला. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news