मराठा आरक्षणासाठी विनायक मेटे यांनी दिलेलं योगदान विसरू शकत नाही - आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले | पुढारी

मराठा आरक्षणासाठी विनायक मेटे यांनी दिलेलं योगदान विसरू शकत नाही - आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा; पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्याचे नेते आणि विधान परिषदेचे माजी सदस्य विनायक मेटे यांच्या निधनाच्या बातमीने मन हेलावून गेलंय. मराठा आरक्षण, मराठा समाज आणि अरबी समुद्रामधील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक या गोष्टींसाठी त्यांनी दिलेलं योगदान कोणीही विसरू शकत नाही. मराठा समाजाला प्रामुख्याने न्याय मिळवून देण्याचे काम विनायक मेटे यांनी मोठ्या प्रमाणात केले. याचे मूल्यमापन शब्दांत करणे कठीण आहे. त्यांच्या जाण्याने मराठा समाजाला दुःख झाले आहे. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून ती भरून न निघण्यासारखी आहे. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. असे सांगत विनायक मेटे यांना भाजप आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

हेही वाचा

Back to top button