कोल्हापूर : राधानगरी धरणाचा तिसरा दरवाजा बंद | पुढारी

कोल्हापूर : राधानगरी धरणाचा तिसरा दरवाजा बंद

राधानगरी, पुढारी वृत्तसेवा : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. त्यामुळे धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक तीन बंद झाला आहे. आज सकाळी दहा वाजता ही स्थिती असून धरणाचे ४,५,६,७ हे ४ दरवाजे अजूनही उघडे आहेत. या चार दरवाज्यांतून ५७१२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर पॉवर हाऊसमधून १६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पंचगंगा नदीच्या पूर पातळीत वाढ सुरूच आहे. आज सकाळी पाणी पातळी  41.7 फुटांवर पोहोचल्याने कोल्हापूरकरांवर महापुराचे सावट कायम आहे. पंचगंगा धोक्याच्या पातळीजवळ आल्याने नागरिकांची धाकधूक वाढली आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. राधानगरी धरणाचे एकूण चार स्वयंचलित दरवाजे खुले असून त्यातून ५ हजार ७१२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Back to top button