सातारा : एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांच्या डोळ्यात स्प्रे मारून चोरटे पसार | पुढारी

सातारा : एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांच्या डोळ्यात स्प्रे मारून चोरटे पसार

कराड; पुढारी वृत्तसेवा : कराड-विटा रस्त्यालगतचे बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. पोलिसांच्या डोळ्यात स्प्रे मारून चोरटे पळून गेलेत. सोमवारी (दि. १८) मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी सचिन अशोकराव वाघमोडे (वय ३८, रा.आदर्श नगर, काळेवाडी, पुणे) याला अटक केली असून अन्य तिघांचा शोध सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, सैदापूर येथील गजानन हौसिंग सोसायटीत एटीएम फोडत असल्याची माहिती कराड पोलिसांना मिळाली. त्यानंतर पेट्रोलिंग करत असलेल्या दामिनी पथकासह बीट मार्शल पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी चौघेजण एटीएम फोडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न करताच चोरट्यांनी पोलिसांशी झटापट करत पळून जण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एका चोरट्याने त्याच्या हातातील स्प्रे पोलिसांच्या डोळ्यात मारला व तेथून पळ काढला. यातील एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले असून अन्य तीन चोरट्यांचा शोध सुरू आहे. या झटापटीत तीन पोलीस जखमी झाले आहेत. दरम्यान, एटीएम सेंटरच्या बाहेर एक संशयास्पद वायर पोलिसांना आढळून आली आहे. त्यामुळे जिलेटीनच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

Back to top button