

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी विधान भवनमधील काँग्रेस पक्ष कार्यालयात बैठक पार पडली. ही बैठक निरीक्षक मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली. काँग्रेस पक्षाचे आमदार या बैठकीला उपस्थित होते.