सातारा : दोन दिवसांत प्रभाग रचना प्रस्ताव सादर | पुढारी

सातारा : दोन दिवसांत प्रभाग रचना प्रस्ताव सादर

सातारा : पुढारी वृत्तसेवा
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. दोन दिवसांत जिल्हाधिकारी प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करणार आहेत. विभागीय आयुक्‍त या प्रस्तावाला दि. 31 मेपर्यंत मान्यता देणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने सन 2011 च्या जनगणनेच्या लोकसंख्येच्या आधारे निवडणुकीसाठी सातारा जिल्हा परिषदेसाठी सदस्य संख्या निश्‍चित केली आहे. निवडणूक आयुक्तांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या आता 73 होणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी सादर करण्याच्या सूचना निवडणूक आयुक्‍तांनी दिल्या आहेत. त्यानुसार दोन दिवसात जिल्हाधिकारी विभागीय आयुक्‍तांकडे हा प्रस्ताव सादर करणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने काही सूचना व बदल दिले आहेत. त्यानुसार नकाशा तयार केला जात आहे. हे काम दोन दिवसांत पूर्ण झाल्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव आयुक्‍तांकडे दाखल केला जाणार आहे.

दरम्यान, प्रारूप प्रभाग रचनेतील विविध मुद्द्यांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांची मंगळवार, दि. 24 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

हेही वाचलत का ?

Back to top button