रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी शरद पवार साताऱ्यात दाखल | पुढारी

रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी शरद पवार साताऱ्यात दाखल

सातारा : पुढारी वृत्तसेवा : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेत होणाऱ्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार  सातारा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. रविवारी (दि.८) दुपारी तीन वाजता शासकीय विश्रामगृहावर ते दाखल झाले. यावेळी त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, विविध अधिकारी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली.

खासदार पवार  हे  सर्किट हाऊसवर दाखल झाल्यानंतर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित पाटणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सारंग पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.

विश्रामगृहातील अजिंक्यतारा या ग्रुपमध्ये त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध पदाधिकाऱ्यांसोबत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त होणारे कार्यक्रम व संस्थेच्या कामकाजाबाबत आढावा यावेळी घेतला. दरम्यान, किसनवीर कारखान्यावर सत्ता मिळवल्याबद्दल आमदार मकरंद पाटील यांचे कौतुक त्यांनी केले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button