Virat Kohli : विराट काेहली पुन्‍हा 'गोल्डन डक'चा शिकार, चाहत्‍यांच्‍या पदरी निराशा | पुढारी

Virat Kohli : विराट काेहली पुन्‍हा 'गोल्डन डक'चा शिकार, चाहत्‍यांच्‍या पदरी निराशा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२२ हंगामातील आज ५४ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्‍यात हाेत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्‍या सामन्‍यात नाणेफेक जिंकून बंगळूरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सर्वांच्या नजरा विराट कोहलीच्‍या  हाेत्‍या. मात्र पहिल्‍याच चेंडूवर ताे शून्‍यवर बाद झाल्‍याने पुन्‍हा एकदा चाहत्‍यांची घाेर निराशा झाली. (Virat Kohli)

 विराट सध्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे. विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक फलंदाज आहे. त्याला क्रिकेट विश्वात रनमशिन कोहली या नावाने म्हणून ओळखले जाते; परंतु यंदाच्या हंगामात कोहलीला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. कोहलीच्या नावावर ११ सामन्यांत २१.६०च्या सरासरीने २१६ धावा केल्या आहेत.(Virat Kohli)

यंदाच्या आयपीएल हंगामात रनमशीन विराट कोहलीला फलंदाजीची लय अजून सापडलेली नाही. यंदाच्या हंगामात बंगळूरने ११ सामने खेळले आहेत. त्यापैकी ६ सामन्यांत बंगळूरचा विजय झाला आहे. ५ सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गुणतालिकेमध्ये बंगळूर संघ सध्या चाैथ्या स्थानी आहे.

आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियम होत असलेल्या बंगळूर विरूध्द हैदराबाद या सामन्यात कोहली पुन्हा एकदा ‘गोल्डन डक’ चा शिकार झाला. सामन्यातील पहिल्याच ब़ॉलवर त्याला हैदराबादचा वेगवान गोलंदाज जगदीशा सुचित याने कॅच आऊट केले.  कर्णधार केन विलियमसनने कॅच घेतला. बंगळूर संघाचे कर्णधारपद साेडल्‍यापासून विराट कोहलीचा  फॉ्र्म गेल्याचे मानले जात आहे.

यंदाच्या हंगामात रनमशीन विराटला बंगळूरच्या फलंदाजीमध्ये त्याला फारसे योगदान दिलेले नाही, यंदाच्या हंगामात त्याला अर्धशतकी खेळी करता आलेली नाही. यंदाच्या हंगामात विराट कोहली तीनवेळा गोल्डन डकचा शिकार झाला आहे. तो हैदराबाद विरूध्द खेळताना दोन वेळा तर लखनौ विरूध्द एकदा गोल्डन डकचा शिकार झाला आहे.

त्यापैकी लखनैविरूध्द खेळताना त्याला फिरकी गोलंदाज दशमंता चमिराने बाद केले तर हैदराबादविरूध्द यंदाच्या हंगामात बंगळूरचे दोन सामने झाले त्या दोन्ही सामन्यात विराट गोल्डन डक झाला होता.हैदराबादविरूध्दच्या पहिल्या सामन्यात मार्को जॉन्सेनने तर दुसऱ्या सामन्यात त्याला जगदीशा सुचितने त्याला आपला शिकार बनवले.

गोल्डन डक म्हणजे नक्की काय?

गोल्डन डक : म्हणजे जेव्हा गोलंदाज फलंदाजाला पहिल्याच चेंडूवर आऊट होतो त्याला क्रिकेट विश्वात गोल्डन डक असे म्हणतात.

क्रिकेटमध्ये डकचे एकूण तीन प्रकार आहेत त्यामध्ये रेग्युलर डक, गोल्डन डक आणि डायमंड डक असे प्रकार आहेत.

रेग्युलर डक : जेव्हा फलंदाज एकही धाव न घेता बाद होतो, त्याला रेग्युलर डक असे म्हणतात. गोल्डन डक म्हणजे जेव्हा गोलंदाज फलंदाजाला पहिल्याच चेंडूवर आऊट होतो त्याला क्रिकेट विश्वात गोल्डन डक असे म्हणतात.

डायमंड डक : जेव्हा फलंदाज सामन्यात एकही चेंडू न खेळता ( धावचीत ) होतो त्याला डायमंड डक म्हणतात .

आयपीएलच्या इतिहासात विराट एकूण सहावेळा गोल्डन डकचा शिकार झाला आहे.

आयपीएलमध्ये विराट कोहली गोल्डन डक्स : कंसात विकेट घेतलेले गाेलंदाज

विरूध्द मुंबई इंडियन्स, चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळूर २००८ (आशिष नेहरा)
विरूध्द पंजाब किंग्ज, चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळूर २०२२ (संदीप शर्मा)
विरूध्द केकेआर, ईडन गार्डनस्, कोलकाता २०२२ (नॅथन कुल्टर-नाईल)
विरूध्द लखनौ, डी.वाय.पी स्टेडियम मुंबई, २०२२ (दुष्मंता चमीरा)
विरूध्द हैदराबाद, ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई, २०२२ (मार्को जॅनसेन)
वि हैदराबाद, वानखेडे स्टेडियम, मुंबई २०२२ (जे सुचिथ)

Back to top button