सातारा : विहे घाटात स्कॉर्पिओ-टेम्पोची धडक; युवक गंभीर | पुढारी

सातारा : विहे घाटात स्कॉर्पिओ-टेम्पोची धडक; युवक गंभीर

मारूल हवेली; पुढारी वृत्तसेवा : कराड-पाटण राज्यमार्गावरील विहे गावानजीक स्कार्पिओ व टेम्पोची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात जखमी युवकाला त्याच मार्गाने जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी उचलून, स्वतःच्या गाडीतून तात्काळ रुग्णालयात नेले. अमित हिंदुराव शिंदे (वय ३४, रा.पाटण) असे अपघातात जखमी झालेल्याचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील हे त्यांच्या गावच्या यात्रेच्या बैठकीसाठी गुरूवार (दि. २८ रोजी) मारूल हवेली येथे गेले होते. बैठक आटोपून परत कराडकडे येताना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कराड-पाटण मार्गावरील विहे व म्होप्रे गावाजवळ स्कार्पिओ व टेम्पोची धडक होऊन भीषण अपघात झाल्याचे समजले. अपघात स्थळी बघ्यांचीही मोठी गर्दी झालेली होती.

सारंग पाटील हे आपल्या गाडीतून खाली उतरून जखमी युवकाकडे धाव घेतली. तेथील परिस्थिती पाहून रूग्णवाहिका मिळण्यासाठी त्यांनी त्वरीत रूग्णवाहिकेला संपर्क केला. मात्र, रूग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. त्यानंतर मल्हारपेठ पोलीसांना याबाबतची माहिती दिली. तसेच जखमींच्या मोबाईलवर आलेल्या कॉलवरून त्याच्या भावाशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली.

याशिवाय कृष्णा हॉस्पिटल येथे फोन करून पुढील आरोग्य यंत्रणा तयार ठेवली. याच दरम्यान परिस्थितीचे गाभीर्य ओळखून रूग्णवाहिकेची प्रतिक्षा न करता जखमी युवकाला तातडीने स्वतःच्या गाडीत घेतले व कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले. एवढेच नाही तर जखमीवर उपचार करण्यास डॉक्‍टरांना विनंती केली. अमित हिंदुराव शिंदे हा युवक अपघातात जखमी झाला होता.

अमित शिंदे याचे पाटण येथे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान असून साहित्याच्या खरेदीसाठी तो एकटाच कराडला जात असताना हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, स्कार्पिओचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. तर टेम्पो पलटी होऊन नुकसान झाले आहे. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जखमीला मदत करणाऱ्या माणुसकीबाज सारंग पाटील यांच्या कामाला प्रत्यक्ष दर्शनींनी दाद दिली.

हेही वाचलंत का? 

Back to top button