Salim Ghouse : 'भारत एक खोज' फेम अभिनेते सलीम घोष यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन | पुढारी

Salim Ghouse : 'भारत एक खोज' फेम अभिनेते सलीम घोष यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

पुढारी ऑनलाईन : हिंदी चित्रपटांतील खलनायकची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते सलीम घोष (Salim Ghouse) यांचे मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालयात ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याबाबतची माहिती सलीम घोष यांच्या पत्नी आणि जवळचे नातेवाईक अभिनेता शारिब हाशमी यांनी दिली.

सलीम घोष (Salim Ghouse) यांच्या पत्नी अनीता सलीम घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल बुधवारी रात्रीपर्यंत सलीम यांची तब्येत ठिक होती. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे तातडीने त्यांना मुंबईतील अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

अभिनेता शारिब हाशमीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सलीम घोष यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. यात त्याने ‘मी सलीम घोष यांना पहिल्यांदा सुबह या मालिकेमध्ये पाहिले होते. तेव्हा त्यांचा आवाज मला खूप आवडला होता. ते ‘मंथन’, ‘कलयुग’, ‘चक्र’, ‘सारांश’, ‘मोहन जोशी हाजीर हो’, ‘त्रिकल’, ‘आघात’, ‘द्रोही’ यांसारख्या चित्रपटांचा भाग राहिले आहेत. तर आज त्याते दुखद निधन झाले आहे. त्यांच्या आत्मास शांती लाभो. असे म्हटले आहे.

सलीम घोष यांनी १९७८ मध्ये अभिनय क्षेत्रात पहिल्यादा पदार्पण केलं होतं. यानंतर त्यांनी ‘मंथन’, ‘चक्र’, ‘कलयुग’, ‘सारांश’, ‘त्रिकाल आघात’, ‘द्रोही’, ‘मोहन जोशी हाजिर हो’, ‘सरदारी बेगम’, ‘कोयला’ आणि ‘सोल्जर’ या चित्रपटांत काम केलं आहे. तसेच त्यांनी ‘ये जो है जिंदगी’, ‘सुबह, भारत एक खोज’ आणि ‘संविधान’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button